अलीकडच्या काही महिन्यातील राजकीय गोंधळ पाहता असे दिसते की कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रांपैकी अनेक लोकांचे काही वर्षापूर्वी उच्चीचे असणारे ग्रह आता वक्री झाले आहेत. अनेकांनी त्यासाठी एव्हाना बऱ्याच ज्योतीर्भास्कारांचे दरवाजे ठोठावायला सुरुवात केली आहे. आपले ग्रह कमीत कमी कसा त्रास देतील यासाठी उपाययोजना शोधल्या जात आहेत. पण आपण कोटीच्या कोटी पराक्रम करून ठेवले आहेत त्याला ज्योतिर्भास्कर तरी काय उतारा देणार? यावर तात्पुरता इलाज म्हणून एक औषध बाजारात गेली अनेक वर्षे उपलब्ध आहे. आपल्यावरील कारवाई हे सूडाचे राजकारण आहे असे जाहीर करायचे आणि आपण कसे स्वच्छ आहोत हे जपत राहायचे ही मलमपट्टी सध्या फार तेजीत आहे.
छगनरावांना चौकशीचे निमंत्रण आल्यापासूनच त्यांनी हा जप सुरु केला पण त्यांना तो फार उपयोगी पडला असे दिसत नाही. त्यांच्या साहेबांनी पण हा जप छगनरावांच्या वतीने करून पहिला पण व्यर्थ. छगनरावांचे एकंदरीत ग्रहमान बघता ( किंवा पुढील काळात त्यांचा फार उपयोग दिसत नसल्याने) साहेबांनी जप बंद केला. परवा भुजबळांचा अटकेआधीचा आणि नंतरचा असे दोन फोटो एकाच फ्रेममध्ये पाहिले. दर्शनीय नक्कीच नव्हते.
सुब्रमण्यम स्वामी हा ग्रह कॉंग्रेसच्या राजघराण्यावर गेली अनेक वर्षे वक्रदृष्टी ठेवून आहे. दोन वर्षापूर्वीपर्यंत कॉंग्रेसचे इतर ग्रह तेजीत होते तरीही सुब्रमण्यम स्वामीनी National Herald प्रकरणात गांधी परिवाराला पळता भुई थोडी करून सोडली होती. आता सरकार गेले, उच्चीच्या ग्रहांना किंमत राहिली नाही, सुब्रमण्यम स्वामीना अनुकूल सरकार आले, स्वतः सुब्रमण्यम स्वामी खासदार झाले आणि त्यात हे AgustaWestland चे जुनेच प्रकरण नव्याने प्रकाशात आले. एवढी वाईट ग्रहदशा असेल तर उतारा तरी कसा मिळावा?
कोणीतरी सांगितले कि "सूडाचे राजकारण…." या मंत्राचा जप करा म्हणजे थोडा आराम पडेल. मग काय विचारता. जप सुरु झाला, सोनियाजी स्वतः आणि इतर भाट, चारण आणि मित्रांनी सुद्धा जप सुरु केला. त्याचसोबत गांधी घराण्याने देशाची किती सेवा केली आणि प्राणही दिले याचाही जप चालू केलाय. थोडा आराम मिळतोय असे म्हणतात. खरे खोटे देव जाणे. सुब्रमण्यम स्वामीनी चिदंबरम यांनाही जेरीस आणले आहे. पण कॉंग्रेस ची प्राथमिकता गांधी घराण्याचा बचाव करण्याची असल्याने सध्या चिदम्बरम यांना आपला आपणच जप करायची वेळ आली आहे.
असो. "जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर" असे म्हणतात. गांधी घराण्याने देशासाठी चांगल्या गोष्टी केल्याही असतील पण त्याचे फळ म्हणून सत्तासुद्धा उपभोगली आहे. त्याच न्यायाने जर काही चुकीचे केले असेल तर त्याची शिक्षाही मिळणारच. नवे नवे मंत्र शोधा. पुढे जप करायला खूप वेळ मिळणार आहे.