लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. राजाने एक रेषा आखली आणि त्या रेषेला स्पर्श न करता ती लहान कशी करता येईल असा प्रश्न केला. हुशार प्रधानाने उत्तर दिले कि त्या रेषेच्या शेजारी त्याहून मोठी रेषा काढली तर पहिली रेषा आपोआप लहान
देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींकडे नजर टाकली तर असं दिसतं की आपली रेषा मोठी करण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. दुसर्याची रेषा कमी करण्याचीच चढाओढ सुरु आहे. बहुतेकशा राजकीय पुढाऱ्यांचा वेळ, शक्ती आणि बुद्धी इतरांची उणीदुणी काढण्यातच खर्च होत असल्याचे चित्र आहे. यातून वेळ काढून समाजाभिमुख रचनात्मक काम करायची बुद्धी जेव्हा येईल तोच सुदिन असेल. परंतु असे "अच्छे दिन" नजीकच्या भविष्यात तरी दिसत नाहीत .
एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या "आपलं ठेवावं राखून आणि दुसऱ्याच पाहावं वाकून" हे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. "सोईस्करपणे विसरण्याची कला" इथे मदतीला धावून येते. दुसऱ्यांच्या चुका मोठ्या करून दाखवताना आपल्या आणि आपल्या मित्रांच्या तशाच चुका सोयीस्करपणे विसरता येणे गरजेचे आहे. सद्य परिस्थितीत याला अपवाद ठरताना कोणीही दिसत नाही.
केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचे दस्तावेज प्रसिद्ध करण्यासाठी २३ जानेवारी चा मुहूर्त काढला. हे जाहीर होताच काँग्रेस च्या मित्रांना कंठ फुटला आणि दस्तावेज खुले करण्यासाठी जानेवारी पर्यंत वाट का बघावी असा खडा सवाल त्यांनी केला. मात्र असा सवाल करताना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६८ पैकी ५८ वर्षे आपलेच सरकार असूनही आपण याकडे दुर्लक्ष केले आणि नेताजींच्या तथाकथित मृत्युनंतर ७० वर्षे आपण जनतेला वाट पाहायला लावली हे मात्र सोईस्करपणे विसरले. सगळ्याच राजकीय पक्षांवर सडकून टीका करून दिल्लीचे तख्त मिळवणारे आम केजरीवाल कुणालाही थांगपत्ता लागू न देत खास झाले आणि सत्तेवर येण्याआधी आपल्याकडे असलेले पुरावे आपण कुठे ठेवले हे सत्तेवर येताच सोईस्करपणे विसरले.
भारतीय जनता पक्ष केंद्र आणि राज्यातही सत्तेवर आहे. पाकिस्तान सोबतचे भारताचे संबंध बिघडल्याने पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला सरकारने मनाई केली आहे. थोडक्यात म्हणजे राजकीय संबंध दुरावलेले असताना इतर क्षेत्रांत सहकार्याला भाजपाचा विरोध आहे. असे असताना त्याच पक्षाचे मुख्यमंत्री पाकिस्तानी गायकांच्या आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांच्या कार्यक्रमाला सुरक्षा पुरविण्यासाठी तयार होतात. सामान्य माणसाने किती confuse व्हायचं? मित्रपक्षावर कुरघोडी करण्याच्या नादात मुख्यमंत्री राष्ट्रीय मुद्दा सोईस्करपणे विसरले. पाकिस्तानी गायकांच्या आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला. कित्येक पाकिस्तानी कलाकार हिंदी चित्रपटातून दिसतात तेव्हा शिवसेना भारत-पाक संबंध विसरते कि काय? जावेद मियांदाद चे आदरातिथ्य शिवसेनेने मुंबईत केले तेव्हा द्विपक्षीय संबंध सलोख्याचे होते असे म्हणायला कोणी धजावेल काय? पण हे ही सोईस्कर पणे विसरता यायला हवे.
सगळ्यावर कडी बिहार मध्ये झालीय. निवडणुकीच्या काळात सोयीस्करपणे विसरण्याच्या कलेला सुगीचे दिवस येतात. जेमतेम वर्षभरापूर्वी नितीशकुमारांनी ध्यानीमनी नसताना जीतनराम मांझी ना मुख्यमंत्री केले. नितीश कुमारांच्या विरोधात उभे राहताना मांझी उपकार विसरले. एकेकाळचे कट्टर शत्रू लालूप्रसाद यांच्या गळ्यात गळे घालताना नितीशबाबूंना जंगलराज या त्यांनीच तयार केलेल्या शब्दाचा विसर पडला आणि "धर्मांध" भाजपासोबत आपण ८ वर्षे सत्ता चालवली हे नितीशकुमार सोईस्करपणे विसरले.नितीशकुमारांना दुषणे देताना २-३ वर्षापूर्वीपर्यंत ते बिहारच्या विकासाचा चेहरा होते याचा भाजप नेत्यांना विसर पडला आणि मोदींचे गुणगान करताना न थकणाऱ्या रामविलास पासवान यांनी २००२ मध्ये मोदींना विरोध दर्शविण्यासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता हेही स्मरणातून निघून गेले.
काळ हे सगळ्या दु:खावरचे औषध आहे असे ऐकले होते. त्यामुळे "कालाय तस्मै नम: " अशी उक्ती प्रसिद्ध आहे. पण सध्याच्या superfast जमान्यात हा वेळकाढू इलाज आहे. आहे कोणाकडे एवढा वेळ? तेव्हा सोईस्करपणे विसरणे हा instant इलाज आहे. त्यामुळे "विसराळूपणाय तस्मै नम: " हेच खरे.